प्रेम----- स्नेहा शिंदे

प्रेम प्रेम म्हणजे तरी काय असत ?
प्रेम करणं शहाण्या माणसाचं काम नाही त्यासाठी मुळातच वेडेपणा असावा लागतो वेडसर पणाची झलक दिसेपर्यंत प्रेम पूर्ण होत नाही. समोरच्याला गमावण्याची भीती त्याने फक्त आपलं असावं हि जिद्द अन सतत त्याच्या विचारांच्या सागरात स्वतःला झोकून देणं. अपेक्षा फार काही नसतात त्याने वेळ द्यावा, त्याने प्रत्येक गोष्ट सांगावी. आपल्याकडून देखील काही गोष्टींची अपेक्षा ठेवावी. म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीत त्याने स्वारस्य दाखवावं. प्रेम माया आपुलकी दाखवावी. कधी हक्कानं रागवाव कधी प्रेमान समजवावं. कधी सोबतीन हसावं कधी कुशीत शिरून रडावं. आपण ज्याचे आहोत बस शेवट्पर्यंत त्याचंच असावं. आणखी हवं तरी काय असत प्रेमात ? तू मी आणि वेडेपणा म्हणजेच प्रेम. मला तुझ्या प्रेमात फक्त वेड व्हायचंय आणि काहीच नाही. मी केव्हाचीच तयार आहे तू आहेस ना ?
- स्नेहा शिंदे