राज्यस्तरीय पावरलिप्टींग स्पर्धेत गोवेलीचा कु.अथर्व वाळींबे याने सुवर्ण पदक पटकावले

CRIME BORDER | 16 September 2022 03:46 AM

कल्याण : तालुक्यातील गोवेली गावातील वाळिंबे कुटुंबातील  चि.अथर्व दिनेश वाळिंबे, हा गोवेली येथील जीवनदिप काँँलेज मध्ये बीएस्सी.आयटी च्या दुसर्या वर्गात शिकत आहे. वाळिंबे कुटुबांत शिक्षणाचा आणि व्यायामाचा  वारसा असल्याने  त्याचे आजोबा श्री.मधुकर कुकाजी वाळिंबे.(कब्बडीचे माजी खेळाडू) यांच्या मार्गदर्शनाखाली चि.अथर्व याने गावातीलच व्यायाम शाळेत कसरत करायला सुरवात केली होती.

त्यातुनच त्याला पाँवरलिफ्टिंग या खेळाची गोडी लागली आणि त्या गोडीचं त्यानं सोनं केलं.पाँवरलिफ्टिंग खेळाचा सराव करता करता गोवेली येथे जीवनदिप काँलेज मध्ये ठाणे जिल्हा पाँवरलिफ्टिंग असोसिएशन ने भरवलेल्या स्पर्धेत भाग घेत पहिल्याच प्रयत्नात सब ज्युनिअर गटात सुवर्ण पदक मिळविले. 

 

त्यानंतर ठाणे आणि मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत सुध्दा त्याने पदकांची कमाई केली.चि.अथर्व याची दि.११ व१२ जून २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य स्थरीय पाँवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आणि चि.अथर्व याने त्याच्या कसरतीचा चांगला उपयोग करून त्या स्पर्धेत सुवर्णपदकाची पटकावले.या पदकाच्या यशाचे श्रेय तो त्याचे प्रशिक्षक व घरातील व्यक्ती यांना देतो.