फार उशीर झाला सये........- स्नेहा शिंदे

CRIME BORDER | 16 September 2022 03:53 AM

फार उशीर झाला सये........

फार उशीर झाला सये आता येण बर नाही  

अश्या मोक्याच्या घटिका तुला देणं बर नाही 

नको प्रेमाची लालसा नको पाश ते सुखाचे 

मज साऱ्याहून प्यारे सये दिस हे दुःखाचे 

नको होऊ तू हळवी नको गळ घालू मना 

मज मोह फार होई तुझे हास्य पाहताना 

नको मागे तू वळू अशी निघूनि जाताना 

उरी नको ती ग आशा तु माघारी येताना 

फार उशीर झाला सये आता बोलणं बर नाही 

तुझ्यासाठी तुझ्यासवे आता चालणं बर नाही 

नको क्षणाचा तो मोह तुज आण वचनांची 

जाग तुझ्या कर्तव्याला नको दृष्ट ह्या प्रेमाची 

तू ग सुखाची बरसात सदा संगती मनात 

कोरली ग तुझी छबी खोल माझ्या काळजात 

परी  पुन्हा मागाहूनि नको साद घालू सये 

मज फिरुनी येण्याचे भय उरी फार आहे 

फार उशीर झाला सये वेळ घेणं बर नाही  

अश्या मोक्याच्या घटिका तुला देणं बर नाही 

- स्नेहा शिंदे