क्राईम बॉर्डर दीपावली विशेषांक २०२२ साठी - साहित्य मागवीत आहे.

डोंबिवली (कार्यालय प्रतिनिधी) कल्याण/डोंबिवली येथून दि.१६ऑक्टोबर २०१० पासून प्रकाशित होत असलेले पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे एकमेव - क्राईम बॉर्डर दीपावली विशेषांक २०२२ साठी स्वयं लिखित रहस्य कथा ,प्रवास वर्णन,प्रेम कथा , कविता,प्रेरणादायी कथा,स्वयं लिखित शायरी, विशेष स्तंभ ,ग्रामीण बोली भाषेतील साहित्य, वऱ्हाळी कथा , कोकणी मालवणी भाषेतील कथा , भुताटकी वरील काल्पनिक कथा या सारखे इतर साहित्य त्वरीत मागवीत आहे .
सर्वोत्तम साहित्यास व कवितेस प्रथम ,व्दितीय व तृतीय पारितोषिक देण्यात येईल. दीपावली २०२२ चे सर्व अधिकार व अंतिम निर्णय व्यवस्थापन राखून ठेवत आहे.
साहित्य आपण टायपिंग करून किंवा मोबाईलवर टाईप करून ई-मेलने व पोस्ट, कुरियर ने ही पाठवू शकता. साहित्यासोबत परतीचे पोस्टेज अथवा पत्रोत्तरासाठी १० रुपयाचे दोन स्टॅम्प असणे आवश्यक आहेत, ते नसल्यास कोणत्याही पत्राचे उत्तर दिले जाणार नाही. खास करून कवींनी याची नोंद घ्यावी.साहित्य पुन्हा पुन्हा वाचून शुद्ध केलेले असावे, चुका राहू देऊ नयेत ,तसेच झेरॉक्स पाठवू नयेत.
साहित्यांच्या प्रत्येक पानावर अनुक्रमांक असावा साहित्याच्या अगोदर आपले पूर्ण नाव, पासपोर्ट साईजचे दोन फोटो , पत्ता ,पिन कोड नंबर ,फोन नंबर, मोबाईल नंबर व ई-मेल अवश्य असावा.साहित्य मिळताच ३१ दिवसात त्याची पोच दिली जाईल व त्यानंतर च्या ४५ दिवसातच त्याबद्दलचा निर्णय कळविला जाईल, त्यासाठी पत्रोत्तराचे पोस्टेज नसल्याच साहित्य निकालात काढण्यात येईल .
आम्ही उत्तम ,दर्जेदार साहित्य असणाऱ्यांनाच प्रोत्साहन देतो असे नाही ,तर नवोदितांनाही आम्ही मार्गदर्शन करून प्रसिद्धी देतो.आपण आपले साहित्य खालील पत्त्यावर पाठवावे.
crimeborder@gmail.com
मुख्यालय : - मुख्य संपादक राजेंद्र वखरे : आई द्रोपदा बिल्डींग,३०४,साई बाळाराम कॉम्प्लेक्स समोर,खंडोबा मंदिर रोड डोंबिवली (पश्चिम) ता. कल्याण, जि. ठाणे.४२१२०२ , मोबा. ९६१९६३००३५/९९८७४९६१३६