मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत -एसीपी . सुनील कुराडे ,

CRIME BORDER | 11 March 2023 08:35 AM

एसीपी . सुनील कुराडे ,डोंबिवली 

एसीपी . सुनील कुराडे ,डोंबिवली 

मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळखणारी ही क्षणभरासाठी असतात तर जपणारी आयुष्यभरासाठी माझ्या स्वभावात चुका भरपूर असतील, पण एक चांगली गोष्ट आहे मी कुठलही नातं स्वार्थासाठी जोडत नाही . जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत नुसतं  राब-राब ,राबणे म्हणजे आयुष्य नाही.  स्वतःच्या समाधानासाठी आनंदाने जगणे म्हणजे आयुष्य. वयाला हरवायचे असेल तर आपले छंद नेहमी जिवंत ठेवायला हवे, मानले तर मौज आहे, नाहीतर समस्या रोज आहे.शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात . माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय .

 

अंतरमनात कितीही संघर्ष असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखविणे हाच जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय.  आयुष्यातील आनंदी क्षणासाठी पैशाने कमविलेल्या वस्तुंपेक्षा स्वभावाने कमविलेली माणसं जास्त सुख देतात.  कधी कधी शांतच राहणे खुप गरजेचं असते. आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नाची उत्तरे मागायची नसतात कारण ओंजळीत पाणी तर पकडू शकतो ,पण टिकवून नाही ठेवू शकत निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाही ,म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा नाती कधीच तुटत नाही.  पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. 

 

या जगात नाते तर सगळेच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.  दुसऱ्याच्यां सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात.  कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो ते त्याचे संस्कार असतात जर विश्वास देवावर असेल ना तर जे नशिबात लिहलंय ते नक्कीच मिळणार पण विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हव . स्वतःचा राग इतका महाग करा कि कोणालाही तो परवडणार नाही आणि स्वतःचा आनंद इतका स्वस्त करा कि सगळ्यांना  त्याचा मनसोक्त आनंद घेता येईल.