डॉक्टरनं पत्नीचा केला खून, चालकानं डॉक्टरला संपवलं

रायपूर : डॉक्टर दाम्पत्याच्या हत्याकांडात पोलिसांनी तब्बल आठ वर्षानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहे. डॉक्टरनं पत्नीची हत्या केल्यानंतर तो आपल्यालाही मारुन टाकेल या भीतीनं घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या चालकानं डॉक्टरची हत्या केली. त्यानंतरप घटनास्थळावरुन पुरावे मिटवून पोबारा केला. मात्र पोलिसांनी तब्बल 8 वर्षानंतर या मारेकऱ्याला पकडण्यात यश मिळवलं. हे हत्याकांड कावर्धा इथल्या उच्चभ्रू सोसायटीत 6 एप्रिल 2017 ला घडलं होतं. डॉ गणेश सुर्यवंशी आणि डॉ उषा सुर्यवंशी असं खून झालेल्या दाम्पत्याचं नाव होतं.
डॉक्टरनं केली पत्नीची हत्या चालकानं घातला डोक्यात दगड : कावर्धा शहरात 8 वर्षांपूर्वी घडलेल्या खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आलं. पोलिसांनी केलेल्या नार्कोटीक्स चाचणीत डॉक्टरचा खून त्याच्या चालकानं केल्याचं उघड झालं. डॉक्टरच्या पत्नीची हत्या डॉक्टरनं केल्याचं पोलीस तपासात पुढं आहे. डॉक्टरनं पत्नीची हत्या केल्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या चालकाला पकडलं जाण्याची भीती वाटू लागली. त्यासह त्याला डॉक्टर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा खून करेल, असा धोका वाटा. त्यामुळे त्यानं भीतीनं पत्नीचा खून करणाऱ्या डॉक्टरची हत्या केली.
डॉक्टरचा खून केल्यानंतर स्कार्फ घालून गेला घटनास्थळावर : खून केल्यानंतर आरोपी चालक कावर्धाहून दुर्गला पळून गेला. त्यानंतर मारेकरी चालक दुसऱ्या दिवशी स्कार्फ घालून घटनास्थळी पोहोचला. पोलिसांचा तपास कोणत्या दिशेनं जात आहे, याची खतरजमा करण्यासाठी त्यानं घटनास्थळावर भेट दिली. या खून प्रकरणात पोलिसांना कोणताही सुगावा सापडला नव्हता.
डॉक्टरनं पत्नीची हत्या करताना चालक घटनास्थळावर होता हजर : आरोपी चालकानं 6 एप्रिल 2017 रोजी डॉ. सूर्यवंशी यांची हत्या केली. या हत्येच्या काही मिनिटं आधी डॉ. गणेश सूर्यवंशी यांनी त्यांच्या पत्नी डॉ. उषा सूर्यवंशी यांची हत्या केली. हत्येच्या वेळी चालक घटनास्थळावर उपस्थित होता. डॉक्टर सुर्यवंशी त्याला पुरावे नष्ट करण्यासाठी ठार मारेल, अशी भीती वाटली. या भीतीपोटी त्यानं डॉ. गणेश सुर्यवंशी यांची हत्या केली.
उसणे पैसे मागण्यासाठी गेला, अन् अडकला : रामनगर इथल्या घरात डॉक्टर दाम्पत्याचा मृतदेह रक्तानं माखलेला आढळला. या दुहेरी हत्याकांडानं संपूर्ण शहरात आणि छत्तीसगडमध्ये खळबळ उडाली. कावर्धा शहरात पहिल्यांदाच एका डॉक्टर दाम्पत्याची एकत्र हत्या झाली. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस चौकशीदरम्यान आरोपी हा डॉक्टर दाम्पत्याचा माजी चालक सत्यप्रकाश साहू असल्याचं उघड झालं. त्यानं डॉक्टर दाम्पत्याला काही कामासाठी पैसे उधार दिले होते. उसणी रक्कम 1 लाख 70 हजार रुपये होती. चालक डॉक्टर दाम्पत्याकडं कर्जाची रक्कम मागण्यासाठी गेला. चालक घरात शिरला तेव्हा तो डॉक्टर सूर्यवंशी यांच्याशी बोलू लागला. दरम्यान, डॉक्टरची पत्नीही तिथं पोहोचली. पती-पत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला. वाद इतका वाढला की डॉ. सूर्यवंशी यांनी त्याच्या पत्नीवर दगडानं हल्ला केला. चालक घटनास्थळी उपस्थित असल्यानं तो घटनेचा प्रत्यक्षदर्शी देखील होता.
भीतीतून केली डॉक्टरची हत्या : उसणे दिलेले पैसे मागण्यासाठी गेलेल्या चालकाच्या पुढचं डॉक्टरनं पत्नीचा खून केला. त्यामुळे चालकाला डॉक्टर स्वतःला वाचवण्यासाठी त्याला मारेल, अशी भीती वाटली. या भीतीमुळे चालकानं डॉ. सूर्यवंशींवर हल्ला केला. त्यानं दगडानं डॉक्टरची हत्या केली. मारेकऱ्यानं संपूर्ण घरातील रक्ताचे डाग साफ केले आणि तेथून पळून गेला. डॉक्टर दाम्पत्याच्या हत्येच्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षीसही जाहीर केलं. तपासात पती-पत्नीमध्ये पटत नव्हतं. दोघांमध्ये वारंवार वाद होत होते, असं तपासात उघड झालं.sabhar etv bharat