नाळिंबी येथील विद्यार्थ्यांना पत्रकार समितीमार्फत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

CRIME BORDER | 26 July 2025 11:44 AM

राजेंद्र वखरे यांजकडून

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील अगदी शेवटचे गाव असलेल्या नाळिंबी जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य राष्ट्रीय पत्रकार विकास महा समितीच्या वतीने वाटप करण्यात आले.

ग्रामीण भागातील आदिवासींच्या विद्यार्थ्यांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घ्यावे लागते. शासन स्थरावर त्यांना मदत मिळते परंतु ही मदत पुरेशी नसते म्हणून विविध सामाजिक संस्था त्यांच्या वतीने या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रयत्न करीत असतात. 

नाळिंबी ग्रुप ग्रामपंचायत गावचे माजी उपसरपंच जयराम घरत यांनी सुचविल्यानुसार ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी यांनी महासमितीच्या वतीने येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्राईम बॉर्डर चे संपादक तथा डोंबिवली विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या शांतता कमिटीचे सदस्य राजेंद्र वखरे हे होते.

कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत मुख्याध्यापक दीपक जयवंत वाख यांनी शाळेबद्दल व विद्यार्थ्यांबद्दल त्यांनी माहिती दिली तर शाळेच्या शिक्षिका वृषाली किरण घोलप यांनी सुद्धा माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नारायण सुरोशी व क्राईम बॉर्डर चे संपादक राजेंद्र वखरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.

शालेय पोषण आहारच्या शाळा कमिटी मेंबर अर्चना भोईर यांनी पाहुण्यांना विद्यार्थ्यांना कशाप्रकारे पोषण आहार देण्यात येतो त्याची चव चाखण्यास सांगितले असता पाहुण्यांनी शालेय पोषण आहाराचा आनंद घेतला. त्यांनी शालेय पोषण आहाराचे तसेच मुख्याध्यापक ,शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे कौतुक केले.