२४ वर्ष पत्रकारितेचे : सौ.सीमा वखरे उर्फ माई यांचा ४४ वा वाढदिवस : एक रंजक प्रवास  

CRIME BORDER | 27 July 2025 02:02 PM

शब्दांकन : राजेंद्र वखरे (सर)

आदर्श मुलगी,आदर्श पत्नी,आदर्श माता, क्राईम रिपोर्टर,संपादिका ते संस्थापिका सौ.सीमा राजेंद्र वखरे उर्फ माई यांचा ४४ वा वाढदिवस :एक रंजक प्रवास  

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात असलेल्या जुवार्डी या छोट्याशा खेडेगावात ग्रामसेवक श्री.धनराज आनंदा बिडवे यांचे कुटुंब राहत होते .कुटुंब सुखी समाधानी असल्याने कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती. त्यांच्या कुटुंबात दि. २८ जुलै १९८१ रोजी एक मुलगी जन्माला आली तिचे नाव त्यांनी मोठ्या प्रेमाने सीमा असे ठेवले. लहानपणापासूनच सीमा ही चंचल स्वभावाची असल्याने अभ्यासात तीचे मन रमायचे. हळूहळू ती मोठी होऊ लागली आणि शाळेत जाऊ लागली. तिच्या कुटुंबात आणखी एक तिच्यापेक्षा मोठी बहीण ज्योती व लहान दोन बहिणी व एक भाऊ असे सप्तकोनी कुटुंब आनंदाने जगत होते व आहे . 

आई कौशल्याबाई यांना सर्वात मोठी मुलगी ज्योती, दोन नंबरची सीमा ,तीन नंबरची विना तर चार नंबर भाऊ अजय आणि पाचव्या नंबरला विजया हि सर्वात लहान. घरातील शिस्तबद्ध वातावरण होते . 

वडील जुवार्डी येथे ग्रामसेवक असल्याने त्यांचा दररोज विविध स्वभावाच्या लोकांशी संबंध येत होता. ते कडक स्वभावाचे असल्याने ते जातीने मुलांच्या शिक्षणाबाबत लक्ष पुरवत असत.आई चौथीपर्यंत शिक्षित असली तरी शिक्षणाचे महत्त्व त्या काळात त्यांना समजले होते. म्हणून त्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करीत असत . 

हळूहळू मुली व मुलगा  शिक्षण घेत होते . जुवार्डी या ग्रामीण भागातील शाळेत सीमाने इयत्ता दुसरी पर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर मात्र तिच्या वडिलांची बदली झाल्याने हे सर्व कुटुंब भडगाव तालुक्यातील आमडदे या गावात राहायला आले.

सीमाला आमडदे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेण्यासाठी टाकले तिने त्या ठिकाणीही आपली अभ्यासातील प्रगती दाखवत चौथीपर्यंत शिक्षण घेतले . त्यानंतर तिला आमडदे येथील माध्यमिक विद्यामंदिर मध्ये इयत्ता पाचवीत प्रवेश देण्यात आला. या ठिकाणी इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत सीमाचे प्राथमिक व माध्यमिक तसेच ज्युनिअर कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाले .अभ्यासात चांगली प्रगती असल्याने घरातील मंडळी खूष होती. 

माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत उत्कृष्ट मार्क मिळाल्याने पुढील शिक्षणासाठी ती इच्छुक होती.त्यानंतरआमडदे या गावापासून जळगाव जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या नूतन महाविद्यालयात एफ.वाय.बी.ए.ला तीने  प्रवेश घेतला. या ठिकाणी वर्षभर सीमाने  चांगला अभ्यास केला.तेथून मात्र सीमाने आमडदे गावापासून जवळच असलेल्या तालुक्याच्या भडगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात एस.वाय.बी.ए. ला प्रवेश घेतला. या ठिकाणी तिने एन.एस.एस. कॅम्प मध्ये सहभाग घेतला. महाविद्यालयातील द्वितीय वर्षात शिकत असतानाच तिच्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडला. आतापर्यंत कोणाची तरी मुलगी, बहीण , भाची असलेली सीमा हिच्या विवाहाचा विचार घरामध्ये सुरू झाला. 

अशातच बेटावद बुद्रुक, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव, येथील मूळ निवासी असलेले श्री. श्रावण धनु वखरे यांचे चार नंबरचे चिरंजीव राजेंद्र श्रावण वखरे यांचं स्थळ सिमा ला आले. राजेंद्र वखरे हे सन ०१ ऑगस्ट १९९८ मध्ये  सिम्बॉयसिस कॉन्व्हेंट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मुंब्रा, येथे क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झाले होते .मूळचे पत्रकार असलेले दैनिक जनशक्ती जळगाव येथून प्रकाशित होत असलेल्या आप्पासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेचे धडे घेतलेले राजेंद्र वखरे यांनी बेटावद बुद्रुक येथील प्राथमिक विद्यामंदिरात पहिली ते चौथी व न्यू इंग्लिश हायस्कूल येथे पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेऊन अकरावी बारावी हे शिक्षण न. ह. रांका हायस्कूल (बोदवड) या ज्युनिअर कॉलेजमध्ये पूर्ण केले. त्यानंतर मात्र त्यांनी एफ. वाय. बी. ए. ला, जळगाव येथे एम .जे. महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र तिथे त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शक्य न झाल्याने कला व वाणिज्य महाविद्यालय (वरणगाव,ता.  भुसावळ) या ठिकाणी प्रवेश घेतला. येथून त्यांनी हिंदी विषयातून पदवी घेतली. त्यानंतर शारीरिक शिक्षण महाविद्यालय मलकापूर या ठिकाणी त्यांनी बी.पी‌.एड. ही पदवी घेतली आणि त्यानंतर ते सिम्बॉयसिस कॉन्व्हेंट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे रुजू झाले होते. या ठिकाणी त्यांनी क्रिडा, स्काऊट गाईड, मराठी, हिंदी, एन. सी. सी. चित्रकला विषय शिकविले. 

त्यांचेही विवाहयोग्य वय झाल्याने त्यांनी सीमा हिला लग्नाची मागणी घातली सर्व नातेवाईकांच्या सहमतीने सीमाचा राजेंद्र सरांशी विवाह ठरला. तो विवाह १४ एप्रिल २००० साली आमडदे ता. भडगाव येथे संपन्न झाला.

नोकरदार घरातील सर्व सुख संपन्न जीवन जगत असलेली सिमा मात्र आता वखरे घराण्याची सून झाली होती . थेट खानदेशातून कल्याण तालुक्यात असलेल्या गोवेली या छोट्याशा गावामध्ये सौ. सीमा व राजेंद्र सर यांचा संसार सुरू झाला. कमी पगारात संसाराचे रहाटगाडगे सुरू होते.  लग्न होऊन आल्यानंतर सौ.सीमा यांचे शिक्षण मात्र राजेंद्र सरांनी थांबवले नाही, त्यांनी सौ.सीमा यांचे शिक्षण सुरूच ठेवले.

सौ .सीमा वखरे यांनी भडगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयातून मराठी विषयातून पदवी संपादित केली. त्यानंतर ठाणे येथील विधी महाविद्यालयात सौ. सिमा वखरे यांनी एल. एल. बी. साठी प्रवेश घेतला परंतु सन २००१ साली त्यांना आई ही सर्वात मोठी पदवी प्राप्त झाली. 

दि. ३१ ऑक्टोबर २००१ साली सौ. सीमा व राजेंद्र यांच्या पोटी चिरंजीव शिवम याचा जन्म झाला. त्यानंतर दि. १७ एप्रिल २००३ रोजी चिरंजीव सत्यम याचा जन्म झाला. मुलाच्या संगोपनामध्ये व इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणात सन २००७ उजाडले आणि मग पुन्हा सीमाचे शिक्षण सुरू झाले त्यांनी कल्याण येथे बिर्ला महाविद्यालयात एम. ए. मराठी  साठी प्रवेश घेतला. 

हे करत असताना सौ. सिमा यांना सन सप्टेंबर २००१ साली इचलकरंजी येथून निघत असलेल्या गुन्हे विषयाला वाहिलेले साप्ताहिक काली गंगा यामध्ये क्राईम रिपोर्टर म्हणून संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने केले. त्यांनी महिला क्राईम रिपोर्टर म्हणून काम सुरू केले. 

२००७ साली वखरे दापत्य कल्याण शहरामध्ये राहायला आले, या ठिकाणी त्यांनी स्वतःचे घर खरेदी केले. राजेंद्र वखरे सरांनी सन २००८ साली भारत सरकारच्या पंजीकृत साप्ताहिक महाराष्ट्र नाभिकची मुहूर्तमेढ रोवली. या दरम्यान सौ .सीमा यांनी डी. टी.पी., एम. एस.- सी. आय. टी. कोर्स पूर्ण केला व संपूर्ण साप्ताहिक महाराष्ट्र नाभिक ची डी. टी. पी. डिझाईन त्या स्वतः घरी करू लागल्या.

आता सौ. सीमा वखरे यांनी मुलगी, बहीण, भाची, हि  महत्त्वाची जबाबदारी  सांभाळत असताना एक आदर्श पत्नी व आदर्श आई म्हणून त्यांनी जीवन पणाला लावले.  जास्तीत जास्त वेळ त्यांनी मुलांना दिला व मुलांच्या मनामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. जेमतेम पगारामध्ये संसार सुरू होता. या काळात  राजेंद्र वखरे सर यांनी महान पोलीस टाईम्स मराठी व महान पोलीस टाईम्स हिंदी, साप्ताहिक कालीगंगा,  पोलीस शोध, दक्ष पोलीस टाइम्स, खरा गुन्हेगार, रहस्य चक्र, पोलीस टाइम्स, खरा गुन्हेगार, रहस्य चक्र, पोलीस टाईम्स या वृत्तपत्रासह यापूर्वी त्यांनी दैनिक जनशक्ती, गावकरी, बातमीदार, पीपल्स टाइम्स, जळगाव या वृत्तपत्रासह यापूर्वी त्यांनी दैनिक जनशक्ती, गावकरी, बातमीदार, पीपल्स टाइम्स, जळगाव टाइम्स आदी दैनिकात कार्य केले होते. याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी होता. 

सन २०१० साली वखरे दाम्पत्य ते राहत असलेल्या जागेचे रिडेव्हलपमेंट मुळे डोंबिवली येथे राहायला आले. या ठिकाणी मात्र क्राईम जगतात लिखाणाच्या प्रदीर्घ अनुभवानंतर त्यांचे स्वतःचेच दि. १६ ऑक्टोबर २०१० साली क्राईम बॉर्डर पाक्षिक सुरू झाले. या पाक्षिकाच्या कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री व विद्यमान भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले.

क्राईम बॉर्डर व महाराष्ट्र नाभिक या साप्ताहिका बरोबरच वखरे दाम्पत्य हे सामाजिक कार्यात अग्रेसर राहू लागले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून त्यांनी एसीबी चे अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय श्री. डी. डी. गवारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली.

त्याचबरोबर आपण पत्रकारांसाठी, समाजासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन या एनजीओची स्थापना  राजेंद्र वखरे सरांनी  केली या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली.

क्राईम बॉर्डर व संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या कामाची रूपरेषा सौ. सिमा वखरे उर्फ माई या साकारत होत्या तर संकल्पना श्री. राजेंद्र वखरे सर निर्माण करत होते. महाराष्ट्र राज्यातील विविध सामाजिक संस्थांना भेटी देणे व नवीन शिकणे सुरू झाले. काही संस्थांना जे हवे आहे, ती मदत त्यांनी उपलब्ध करून दिली. पुढे सौ. सिमा वखरे उर्फ माई यांनी आश्रय महिला संस्था (कल्याण)  स्थापन केली महिलांच्या उत्थानासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले महिलांमध्ये व मुलींमध्ये जागरूकता निर्माण केली. 

सौ . सिमा वखरे उर्फ माई आता फक्त कुणाची तरी मुलगी, पत्नी , आई नसून त्या अनेकांच्या माई म्हणून काम करू लागल्या त्यांना अनेक मानसकन्या व मानस पुत्र,बंधू भगिनीं  यांची जोड मिळाली. अवघ्या ४४ व्या वर्षी त्या अनेकांच्या माई झाल्या व आयुष्यभर राहतील यात शंकाच नाही. 

त्या अन्यायाविरुद्ध लढू लागल्या.  वेळप्रसंगी पोलीस स्टेशन असू दे किंवा कोर्टकचेरी असू दे त्यांनीं पुढाकार घेत अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून दिला. अनेकांचे संसार बसवून दिले, घरगुती भांडणे मिटविली. वर्षभर विविध राष्ट्रीय सण त्या साजरा करू लागल्या. महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजऱ्या करतात .  या सर्वांची दखल घेत डोंबिवलीचे एसीपी सुहास हेमाडे व एसीपी सुनील कऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी त्यांची महिला दक्षता समितीवर नुकतीच मेंबर म्हणून नियुक्ती केली.

मागे वळून पाहताना दि. २८ जुलै १९८१ ते दि. २८ जुलै २०२५ या ४४ वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी अनेक चढ-उतार बघितले एवढेच नव्हे तर दि. २६ जुलै २००५ साली रायता, तालुका कल्याण येथील संपूर्ण संसार पाण्याखाली गेला.त्यावेळेस सुद्धा राजेंद्र सरांनी व सौ.सीमा उर्फ  माई यांनी २५ कुटुंबांना टिटवाळा पोलीस स्टेशनच्या मदतीने पुरातून बाहेर काढून गोवेली या ठिकाणी सुरक्षित पोहोचविले होते.  

त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या परंतु त्या डगमगल्या नाही . त्यांचा संपूर्ण संसार पाण्यात वाहून गेल्यावर सुद्धा त्यांनी स्वतःचा संसार उभा करून अनेकांना संसारात त्यांनी आधार दिला . 

अशा या कणखर नेतृत्व असलेल्या, सदैव स्पष्ट बोलणाऱ्या, अनेकांची चूक लक्षात आणून देणाऱ्या, विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या, सात वृत्तपत्राच्या डीटीपी व डिझाईन करणाऱ्या आणि श्री स्वामी सखा मासिकाच्या मुख्य संपादिका, क्राईम बॉर्डरच्या नूतन व्यवस्थापिका तसेच आश्रय  महिला संस्थेच्या संस्थापिका यासह अनेक पदं सांभाळणाऱ्या सौ. सिमा राजेंद्र वखरे उर्फ माई यांना दिनांक २८ जुलै २०२५ रोजीच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त खूप सार्‍या शुभेच्छा ! त्यांना निरोगी आयुष्य लाभो व त्यांच्या हातून खूप मोठे सामाजिक कार्य घडो अशा क्राईम बॉर्डर परिवारातर्फे व जीवनसाथी या नात्याने शुभेच्छा व्यक्त करतो. 

टीप : गेल्या काही वर्षापासून माझी अर्धांगिनी सौ. सीमा  वखरे यांच्याबाबत लिहावे असा मानस होता परंतु ती वेळ येत नव्हती आज ती वेळ आली आणि त्यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त केले. धन्यवाद ! वंदे मातरम !! , जय हिंद !!! , जय महाराष्ट्र !!!! 

 

सौ. सीमा राजेंद्र वखरे 

संपादिका : श्री स्वामी सखा (मासिक)

बी. ए.(मराठी) ,एम .सी. जे.,

मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, एम.एस.सी.आय.टी ,एम.सी.इ.डी. प्रोजेक्ट कॉर्डिनेटर

-----------------------------------------------------------

शब्दांकन : श्री .राजेंद्र श्रावण वखरे (सर)

मुख्य संपादक : क्राईम बॉर्डर,

मा. विशेष कार्यकारी अधिकारी,

एम.ए. (पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन),

एम.सी.जे.( मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझम),

शांतता कमिटी सदस्य : विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवली,

पोलीस टाइम्स : सीनियर क्राईम रिपोर्टर , कोकण डिव्हिजन इंचार्ज,  

स्काऊट गाईड मास्टर

-----------------------------------------------------------