वैभव वानखेडे यांची क्राईम बॉर्डर च्या प्रतिनिधी पदावर नियुक्ती

CRIME BORDER | 6 June 2025 10:17 AM

डोंबिवली (प्रधान कार्यालय) : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या  मानसेवी प्रतिनिधी पदावर डोंबिवली येथील वैभव एकनाथ वानखेडे यांच्या सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक  राजेंद्र वखरे यांनी नियुक्ती जाहीर केली आहे. 

वैभव वानखेडे हे इंजिनियर असून त्यांना सामाजिक व जनसेवेच्या कार्याची आवड असून गोरगरिबांसाठी क्राईम बॉर्डर व पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून त्यांना सामाजिक कार्य करायचे आहे. त्यांच्या या निवडीने आप्त , मित्र परिवार व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. वैभव वानखेडे हे समाजसेवक जेष्ठ एकनाथ वानखेडे  यांचे चिरंजीव आहेत.