श्री.कैलास झोडगे यांची क्राईम बॉर्डरच्या उप संपादक पदी नियुक्ती

CRIME BORDER | 6 June 2025 10:49 AM

श्री.कैलास झोडगे  यांची क्राईम बॉर्डर च्या उप संपादक पदावर नियुक्ती जाहीर करतांना क्राईम बॉर्डर चे मुख्य संपादक राजेंद्र वखरे

डोंबिवली (प्रधान कार्यालय) : पोलीस व गुन्हेगारी जगताची बित्तंबातमी देणारे क्राईम बॉर्डर च्या उप संपादक पदावर नुकतीच दिवा येथील  श्री.कैलास झोडगे यांची नियुक्ती मुख्य संपादक राजेंद्र वखरे यांनी केली आहे.

श्री.कैलास झोडगे हे क्राईम बॉर्डर परिवारामध्ये सन २०१४ पासून कार्यरत असून त्यांनी यापूर्वी क्राईम बॉर्डरच्या विविध पदावर उत्तम कार्य केले असून ते २०२० पासून महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी पदावर कार्यरत होते . त्यांचे उत्तम कार्य पाहून त्यांचे क्राईम बॉर्डरच्या संपादकीय विभागाने त्यांची उपसंपादक म्हणून नियुक्ती केली आहे.

श्री.कैलास झोडगे यांना  सामाजिक व अध्यात्मिक जनसेवेची विशेष आवड असून त्यांना क्राईम बॉर्डर व पावन भूमी चॅरिटेबल ट्रस्ट तसेच क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (एनजीओ ) च्या माध्यमातून सामाजिक कार्य करायचे आहे .त्यांच्या या निवडीने आप्त मित्रपरिवार व सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा क्राईम बॉर्डर व  क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन (NGO)तसेच पावन भूमी चॅरिटेबल  ट्रस्टला नक्कीच उपयोग होईल असे उद्गार मुख्य संपादक श्री. राजेंद्र वखरे यांनी नियुक्ती जाहीर करताना काढले.