" संत नामदेव " -सुरेखा मालवणकर .

CRIME BORDER | 16 September 2022 04:28 AM

महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले आणि त्यांचे  वरदान लाभले .भागवत धर्माच्या प्रचाराबरोबरच संत साहित्याने समाज जागृती आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवली . त्यातीलच एक संत म्हणजे संत नामदेव . संत नामदेवांची जेव्हा संत ज्ञानेश्वरांशी भेट  झाली तेव्हा त्यांचे जीवनच बदलले .आत्ताच पंजाब मधील घुमान ह्या गावी आखिल भारतीय साहित्य संमेलन झाले ते पंजाब म्हणजे संत नामदेवांची कर्म भूमी .संपूर्ण भारतात भागवत धर्माचा प्रचार करत करत ते पंजाब पर्यंत फिरत फिरत गेले म्हणूनच त्या गावाला घुमान हे नाव पडले तेथे संत नामदेवांचे समाधी मंदिर आहे . शिखांच्या ग्रंथांमध्ये संत नामदेवांचे नामदेव कि गुर्बानी नावाचे ६० अभंग आहेत . विठ्ठलाच्या भक्तीने आणि देवाच्या साक्षात्काराने त्यांनी चमत्कार ही केले त्यामुळेच तेथील लोक त्यांना पूजतात .

         संत नामदेवाचे जीवन चरित्र ......

संत नामदेवांचा जन्म महाराष्ट्रातील कृष्णा नदीवर स्थित नरस वामनी गाव , जिल्हा सातारा येथे झाला . ते जातीने शिंपी होते .त्यांच्या आईचे नाव गोनाबाई आणि वडील दमा शेटजी , आईवडील दोघेही विठ्ठल भक्त होते त्यामुळे नामदेव जींना विठ्ठलाची फार भक्ती जडली होती . वयाच्या ७ व्या वर्षापासून ते विठ्ठलाचे अभंग गाऊ लागले .त्यांचा रोजचा दिवस विठ्ठल भक्तीत दर्शनात आणि अभंगात जात असे भक्ती संप्रदायाची ध्वजा संत नामदेवांनी  महारष्ट्रात रोवलिच परंतु ती महाराष्ट्रा पुरताच न ठेवता पंजाब आणि राजस्थानपर्यंत पोचवली .महाराष्ट्रातील सर्व संतांमध्ये संत नामदेवाचे अनन्य साधारण महत्व आहे. त्यांना वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक मानले जाते .संत नामदेवांचे लग्न राधाबाईशी झाले असले तरीही त्यांचे संसारिक कार्यात अजिबात मन लागत नसे .विठ्ठलाकडे पहात ते भक्तीत लीन होऊन ते आपल्या व्यथा सांगत असत .

         सर्व संतांचे पंढरी हे माहेरघर .एकदा संत ज्ञानेश्वर आपल्या भावाबहिणी बरोबर पंढरपूरला आले तेव्हा संत नामदेव चंद्रभागेतीरी कीर्तन करत होते . हे पाहून ज्ञानदेव ,निवृत्ती ,सोपान ,मुक्ताबाई प्रभावित झाले .नंतर ज्ञानदेवाच्या आग्रहाने ते संत मंडळीत समाविष्ट झाले . संत नामदेवांचा  कोणीही गुरु नव्हता ते विठ्ठलालाच आपला गुरु मानत मग संत ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून त्यांनी ज्ञानदेवाचे शिष्य विसोबा खेचर ह्यांना आपला गुरु केले आणि व्यापक परमेश्वराचे ज्ञान मिळवले मग त्यांचे जीवन खर्या अर्थाने बदलत गेले आणि ज्ञानेश्वरांपासून ते पुन्हा कधीच विभक्त झाले नाहीत त्यांच्याबरोबर संत नामदेवांनी संपूर्ण भारत भागवत प्रचार केला ह्या प्रचारा नंतर ज्ञानेश्वरांनी गाव भंडारा ठेवला त्या  भंडाऱ्यात साक्षात विठ्ठल-रुक्मिणी हजर होते . त्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी २०/२१ वर्षात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेण्याचा निश्चय केला . समाधीच्या एक वर्षातच मुक्ताबाई ,निवृत्ती आणि सोपान जी ह्यांना देवाज्ञा झाली त्यावेळी संत नामदेव हे सर्व जवळून पहिले होते आणि जाणले होते आणि त्यांचे जीवन वर्णन त्यांनी आपल्या अभंग रचनेत केले आहे .नामदेवांचे अभंग आजही आपण भक्तिभावाने ऐकतो त्यातील

एक  अभंग ............   llघालीन लोटांगण वंदिन चरण

                                    डोळ्यांनी पाहीन रूप तुझे

                                    प्रेमे  आलिंगन आनंदे पूजीन

                                    भावे ओवाळीन म्हणे नामा ल............हा अभंग म्हटल्याशिवाय कुठलेही देव कार्य किव्हा उत्सव पूर्ण होत नाही .वारकरी संप्रदायाचा प्रचार करत फिरत फिरत ते पंजाबला गुरुदासपूर येथे आले म्हणून त्या गावास घुमान हे नाव पडले .वेळोवेळी त्यांनी चमत्कार ही केले ,तेथील लोक त्यांना पुजू लागले तेथेच त्यांचे समाधी मंदिर बांधले आहे .काही लोकांच्या मते त्यांनी वयाच्या २६व्या वर्षी पंढरपुरात समाधी घेतली आणि त्यांच्या अस्थी पंढरपूरच्या मंदिराच्या पहिल्या पायरीत रोवल्या आहेत .

- सुरेखा मालवणकर .