श्री स्वामी सखा - दीपावली विशेषांक २०२१ साठी साहित्यिकांना आवाहन

shree swami sakha magazine news network
डोंबिवली (कार्यालय प्रतिनिधी) : कल्याण येथून दि.२२ मार्च २०१५ पासून प्रकाशित होत असलेले कृपासिंधू-मनःशांती व आत्मविश्वास वाढविणारे स्वामीभक्तांचे एकमेव मासिक-श्री स्वामी सखा , व्यवस्थापन जगभरातील तमाम ज्येष्ठ व नवोदित साहित्यिक कवी यांना नम्र आवाहन करीत आहे की, श्री स्वामी सखा दीपावली विशेषांक २०२१ साठी,आपणास आलेले स्वामींचे अनुभव,स्वामींच्या विविध माठातील माहिती स्वामींवरील स्वयंलिखित कविता,प्रेरणादायी कथा व इतर सर्व प्रकारचे साहित्य त्वरीत पाठवावे.
सर्वोत्तम साहित्यास व कवितेस प्रथम ,व्दितीय व तृतीय पारितोषिक देण्यात येईल. दीपावली २०२१ चे सर्व अधिकार व अंतिम निर्णय व्यवस्थापन राखून ठेवत आहे.
साहित्य आपण टायपिंग करून किंवा मोबाईलवर टाईप करून ई-मेलने व पोस्ट, कुरियर ही पाठवू शकता. साहित्यासोबत परतीचे पोस्टेज अथवा पत्रोत्तरासाठी पाच रुपयाचे दोन स्टॅम्प असणे आवश्यक आहेत, ते नसल्यास कोणत्याही पत्राचे उत्तर दिले जाणार नाही. खास करून कवींनी याची नोंद घ्यावी.साहित्य पुन्हा पुन्हा वाचून शुद्ध केलेले असावे, चुका राहू देऊ नयेत ,तसेच झेरॉक्स पाठवू नयेत.
साहित्यांच्या प्रत्येक पानावर अनुक्रमांक असावा साहित्याच्या अगोदर आपले पूर्ण नाव, पत्ता ,फोन नंबर, मोबाईल नंबर व ई-मेल अवश्य असावा.साहित्य मिळताच २१ दिवसात त्याची पोच दिली जाईल व त्यानंतर च्या ४५ दिवसातच त्याबद्दलचा निर्णय कळविला जाईल, त्यासाठी पत्रोत्तराचे पोस्टेज नसल्याच साहित्य निकालात काढण्यात येईल .
आम्ही उत्तम ,दर्जेदार साहित्य असणाऱ्यांनाच प्रोत्साहन देतो असे नाही ,तर नवोदितांनाही आम्ही मार्गदर्शन करून प्रसिद्धी देतो.आपण आपले साहित्य खालील पत्त्यावर पाठवावे.
shreeswamisakha15@gmail.com
मुख्य संपादिका सौ. सीमाताई वखरे-श्री स्वामी सखा (मासिक ) मुख्यालय : - आई द्रोपदा बिल्डींग,३०४,साई बाळाराम कॉम्प्लेक्स समोर,खंडोबा मंदिर रोड डोंबिवली (पश्चिम) ता. कल्याण, जि. ठाणे.मोबा. ९६१९६३००३५/९९८७४९६१३६