सलमान खान हत्येचा कट प्रकरणी मुंबई पोलिस चौकशीसाठी राजपुरा येथे दाखल

पटियाला : पंजाबी गायक सिद्धू मुसावाला खून प्रकरणात अटक करण्यात आलेला शार्प शूटर दीपक मुंडी आणि त्याच्या दोन अन्य गँगस्टर साथीदारांना राजपुरा येथे ठेवण्यात आले आहे. त्यांची चौकशी करण्यासाठी पंजाबचे डीजीपी दाखल झाले असून मुंबई पोलीसही दाखल झाले आहेत. ( Mumbai Police arrived in Patialas Rajpura )
धमकी मिळाल्यानंतर प्रसिद्ध अभिनेता सलमान खान, त्याचे वडील लेखक सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. सलमान, सलीम यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने लागलीच कारवाई केली. राज्य सरकारच्या गृह खात्याने सलमान खान, सलीम खान यांची सुरक्षा वाढवली असून त्यासंदर्भात अधिक तपास सुरू केला होता. दरम्यान पंजाब पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी सलमान खानच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर रेकी केल्याचे सलमानला दोन वेळा मारण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक दिल्लीला जाऊन या आरोपींची चौकशी करणार आहे.