Karnataka Father Murdered His Daughter : मुलीचे दलित मुलावर प्रेम या रागातून बापाने मुलीचा केला गेम

म्हैसूर : कर्नाटक राज्यातील म्हैसूर जिल्ह्यात असलेल्या पेरियापटना कागगुंडी गावातील एका व्यक्तीने आपल्या मुलीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे . दलित समाजातील मुलाशी आपल्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून हा खून केल्याची माहिती समोर आली आहे.पोलीससूत्रानुसार, सुरेश नावाचा आरोपी मंगळवारी पोलीस ठाण्यात आला आणि त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे.
प्री-युनिव्हर्सिटी कोर्समध्ये दुसऱ्या वर्षात असलेली विद्यार्थिनी असलेली ही मुलगी वोक्कालिगा समाजाची होती. जी राज्यातील उच्चवर्णीय मानली जाते. तिचे एका दलित मुलासोबत प्रेमसंबंध जुळले होते. हा मुलगा जवळच्या मेल्लाहल्ली गावातील निवासी असून दोघांचे मागील ३ वर्षांपासून प्रेम संबंध होते, अशी माहिती दिली आहे.पोलीस सूत्रांनी दिली की, काही दिवसांपूर्वी मुलीने तिच्या पालकांना फोन करून सांगितले की, की तिचे त्या मुलावर प्रेम आहे. आणि फक्त त्याच्याशीच लग्न करणार आहे. यानंतर वडिलांना मुलीने दलीत मुलावर प्रेम केले आणि त्याच्याशी लग्न करणार आहे अशी तीने भूमीका घेतल्याने याचा राग तिच्या वडिलालांना आला आणि मुलीचा खून केला .